Friday, February 23, 2024

पालिका निवडणूकीसाठी भाजपाच्या जोरदार तयारीला अंतर्गत गटबाजीचा अडसर

Sangamner Nagarpalika
Sangamner Nagarpalika

संगमनेर (संजय आहिरे)
याच महिना अखेरीस संगमनेर पालिकेची मुदत संपत आहे, परंतु कोविडमुळे व प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे निवडणूक पुढे ढकलली आहे. हि निवडणूक फेब्रुवारी 22 मध्ये होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणूक लगबग मात्र सुरू झाली आहे. संगमनेर पालिका निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने आघाडी घेत जोर बैठकांचा धडाका लावला आहे. शेजारच्या तालुक्यातून भाजपला यावेळी पुर्ण रसद मिळणार असली तरी पक्षातील अंतर्गत गटबाजी मात्र या प्रयत्नाला अडसर ठरत आहे.


राज्यात सध्या महाआघाडीचे सरकार आहे आणि संगमनेरातही अशीच महाआघाडी व्हावी यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस देव पाण्यात ठेऊन आहे. मात्र काँग्रेस त्यास फारशी अनुकूल नाही असे चित्र दिसते. मात्र ऐनवेळी अशी आघाडी झालीच तर भाजप हाच प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे. हि शक्यता गृहीत धरून किंवा महाआघाडी झाली नाही तरी शिवसेना भाजप युती आता होणे शक्य नसल्याने भाजपने स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान पक्षात अंतर्गत गटबाजी असून हि गटबाजी थोपविण्यासाठी वरीष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला जर यश आले तर भाजप पुर्ण ताकतीने या निवडणुकीला सामोरे जाणार यात शंका नाही. भाजपकडून शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष डॉ.अशोक इथापे, व्यापारी आघाडीचे शिरीष मुळे, माजी अध्यक्ष सिताराम मोहरीकर, राम जाजू, ज्ञानेश्‍वर कर्पे, राजेंद्र सांगळे, राजेंद्र देशमुख, श्रीराज डेरे, दिपक भगत, जावेद जहागिरदार, सौ. मेघा भगत, राजेश चौधरी, भारत गवळी, संपत गलांडे, रोहित चौधरी यांची मोठी टिम कार्यरत आहे. त्याच बरोबर विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासह अनेक हिंदूत्ववादी संघटनांचे पाठबळ पक्षासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा सोबतीला आहे. तसेच शेजारच्या लोणी व अकोलेतून पुर्ण रसद मिळणार आहे. त्यामुळे भाजपने पुर्ण ताकतीने पालिका निवडणुक लढण्याचा निर्धार केला आहे.


आजच्या घडीला कागदावर तगडी दिसणार्‍या भाजपच्या टिमला मात्र अंतर्गत गटबाजीचा धोका जाणवत आहे. शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले यांना मानणारा एक गट आहे तर दुसर्‍या गटाला त्यांचे नेतृत्व मान्य नाही. हे अनेक वेळा स्पष्टपणे समोर आले आहे. गणपुले हे आक्रमक नेतृत्व आहे, पालिका निवडणुकीचा व पालिका कारभाराचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. वकील असल्याने कायद्याचे जाणकार आहेत मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे अजून तरी त्यांचे नेतृत्व उजाळुन निघालेले नाही. मधल्या काळात व आगामी काळातही इतर पक्षातून नाराजांची फौज भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेजारील नेतृत्व प्रयत्नशील आहे. मुस्लिम हा भाजपचा पारंपरिक मतदार नाही परंतु लोणीकरांना मानणारा मोठा गट या समाजामध्ये आहे. त्याचाही फायदा करून घेण्यासाठी कट्टर हिंदूत्ववाद काहिसा बाजूला करून प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. शहरातील जवळपास सहा ते सात जागांवर या समाजाचे प्राबल्य आहे त्यामुळे सर्वांच्या नजरा या समाजाकडे आहेत. एकुणच भाजपकडून हि निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात येणार आहे परंतु त्यासाठी संघटितपणे लढले तरच सत्ताधार्‍यांपुढे याचा निभाव लागणार आहे. अन्यथा नेहमीप्रमाणे एक दोन जागा मिळवून समझोता एक्सप्रेसवर समाधान मानावे लागणार आहे. भाजपच्या हालचालीकडे सर्वांचेच बारकाईने लक्ष आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

Strength Celebrities Slot

ContentPotential To possess Profitable Real moneyType of Gambling enterprise Bonuses And you may AdvertisementsMore Stars FaqAmatic Slot machine Reviews No Totally free GamesBlazing Celebrity...

Free Spins Dags dat Over house of fun slotspil 100+ Gratis Spin Bonusser

ContentOmsætningskrav Eksklusiv Depositu Fr SpinsSpilleban BrangoFandt Du Ikke ogs Den Afkastning Inklusive Fr Spins, Man Søgte Bagefter? Selvom fungere ovis gratis spins medmindre depositu, sådan...

32red Web based casino 21 sign up poker Site Opinion

ArticlesEd Local casino Review Multiple PrizeGame At the 32red CasinoEd Gaming Limitations At the same time, they Usually means Bet365 Has a task from care...

Better Lowest Put Gambling look these up enterprises Ontario To possess 2024

ContentHere are 5 Casinos That have Amazing 5 Put Greeting BonusesWhat's A gambling establishment Deposit?Information Other Casino Dumps Las Atlantis Casino also provides more than...

Pnc Checking account casino 1 deposit Extra 200, 400 Now offers

ArticlesNations Bank Urban centersFortunate Reddish Casino Added bonus RulesCash PullsFunding You to definitely 360 Advertisements: Around step 1,five-hundred For new Offers Accounts For the reason...
web counter